Image Source; Raja Ravi Varma [Public domain], via Wikimedia Commons
Datta Jayanti, or Dattatreya Jayanthi, celebrates the birth of Adi Guru Dattatreya, the Trimurti Avatar – the united and single incarnation of Brahma, Vishn Mahesh, Dattatreya was born as the son of Atri Maharshi and Anasuya. Datta Jayanthi is observed on the full moon day in the month of Margashirsh.
Anasuya, the wife of rishi Atri, was a pious lady and performed intense austerities to have a son with qualities of Brahma, Vishnu and Shiva. Above all Anasuya was noted for her Pativrata Dharma – unparalleled devotion to her husband
To test her Pativrata Dharma, the Trimurtis appeared in the guise of three Sanyasis and asked her to give food in nude. This put Anasuya in a great dilemma. Confident of her Dharma, the pious lady took some water and sprinkled it on the three Sanyasis in order to clean their feet before giving food. Immediately, the three of them were transformed into three babies.
Anasuya suddenly felt like she is a mother and fed the three babies . Thus she gave alms to the Trimurtis in the way they wanted it.
Soon Atri Maharshi returned and realized that the three babies were Trimurtis who had come to fulfill the wish of Anasuya. The sage embraced the three children and they suddenly took the single form of Dattatreya.
Â
Dattatreya remained an Avadutha – a sage who remains in pure nature. He was a supreme yogi. Dattatreya narrated the secrets of Vedanta to Lord Subrahmanya and this teaching later came to be known as Avadhuta Gita.
The twenty four gurus that Dattatreya found in Nature and Society became very famous and is part of several scripture.
श्री दत्तजयंती
एक सांप्रदायिक जन्मोत्सव. मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्ताचा जन्म झाला, म्हणून त्या दिवशी दत्ताचा जन्मोत्सव सर्व दत्तक्षेत्रांत साजरा होत असतो.
जन्मोत्सव साजरा करणे
दत्तजयंती साजरी करण्यासंबंधाने शास्त्रोक्तल असा विशिष्ट विधी आढळून येत नाही. या उत्सवापूर्वी सात दिवस गुरुचरित्राचे पारायण करण्याचा प्रघात आहे. यालाच गुरुचरित्रसप्तांह असे म्हणतात. दत्तमंदिरामध्ये भजन, कीर्तनादी कार्यक्रम आयोजीत केले जातात. दत्तगुरूंची पूजा, धूप, दीप व आरती करून सुंठवड्याचा प्रसाद वाटप करतात. दत्ताच्या हातातील कमंडलू व जपमाळ ब्रह्मदेवाचे प्रतीक आहे. शंख व चक्र विष्णूचे आणि त्रिशूळ व डमरू शंकराचे प्रतीक आहे.
महाराष्ट्रात औदुंबर, नरसोबाची वाडी, गाणगापूर इत्यादी दत्तक्षेत्रांत या उत्सवाला विशेष महत्त्व असते. तामिळनाडूमध्येही दत्तजयंतीची प्रथा आहे. काही ब्राह्मण कुटुंबांत या उत्सवानिमित्त दत्तनवरात्र पाळले जाते व त्याचा प्रारंभ मार्गशीर्ष शुद्ध अष्टमीपासून होतो.
`श्री गुरुदेव दत्त' नामजपाचे महत्त्व
पूर्वजांच्या त्रास असल्यास दैनंदिन जीवनात उद्भवणार्याव समस्यांची काही उदाहरणे खाली दिली आहेत. उदा. परिक्षेच्या वेळी आजारी पडणे, प्रामाणिकपणे अभ्यास करूनही अपेक्षित यश न मिळणे, नोकरी न मिळणे, घरात भांडण-तंटे, लग्न न होणे, लग्न झाले तर पती-पत्नी्चे न पटणे, पटले तर स्वत:मध्ये कोणतेही शारीरिक व्यंग नसतांना मूल न होणे, मूल झाले तर मतिमंद किंवा विकलांग होणे, अपमृत्यु, धंदा न चालणे, दारिद्र्य, शारीरिक आजार अशा समस्या उद्भवतात. या समस्यांवर मात करण्यासाठी विद्यार्थ्यांनी दररोज `श्री गुरुदेव दत्त' हा नामजप किमान १०८ वेळा लिहावा. तसेच मोठ्यांना हा त्रास असल्यास रोज किमान १ तास तरी `श्री गुरुदेव दत्त' हा नामजप करावा. त्रासाच्या तीव्रतेनुसार हा नामजपाचा कालावधी वाढवावा.
दत्ताचा जन्म चालू मन्वंतराच्या आरंभी प्रथम पर्यायातील त्रेतायुगात झाला, असे वर्णन पुराणांत आढळते.
पुराणांनुसार : अत्रीऋषींची पत्नीम अनसूया ही पतीकाता होती. पातिकात्यामुळे तिच्या अंगी एवढे सामर्थ्य आले की, इंद्रादी देव घाबरले आणि ब्रह्मा, विष्णु व महेश यांकडे जाऊन म्हणाले, ``तिच्या वराने कोणालाही देवांचे स्थान मिळू शकेल किंवा कोणीही देवांना मारू शकेल; म्हणून तुम्ही काहीतरी उपाय करा, नाहीतर आम्ही तिची सेवा करू.'' हे ऐकून त्रिमूर्ती रागावले व म्हणाले, ``एवढी काय मोठी पतीकाता, सती आहे, ते आपण पाहू.''
एकदा अत्रीऋषी अनुष्ठानासाठी बाहेर गेल्यावर अतिथींच्या वेशात त्रिमूर्ती आले व अनसूयेकडे त्यांनी भिक्षा मागितली. त्यावर अनसूयेने सांगितले, ``ऋषी अनुष्ठानासाठी बाहेर गेले आहेत. ते येईपर्यंत थांबा.'' तेव्हा त्रिमूर्ती अनसूयेला म्हणाले, ``ऋषींना परत यायला वेळ लागेल. आम्हाला खूप भूक लागली आहे. लगेच अन्न द्या, नाहीतर आम्ही दुसरीकडे जाऊ. `आश्रमात आलेल्या अतिथींना तुम्ही इच्छाभोजन देता', असे आम्ही ऐकले आहे; म्हणून इच्छाभोजन करण्यास आम्ही आलो आहोत.'' मग अनसूयेने त्यांचे स्वागत केले व जेवायला बसण्याची विनंती केली. त्याप्रमाणे ते जेवायला बसले. ती जेवण वाढायला आल्यावर ते म्हणाले, ``तुझे सुंदर रूप पाहून आमच्या मनात अशी इच्छा झाली आहे की, तू विवस्त्र होऊन आम्हाला वाढावेस.'' त्यावर `अतिथीला विन्मुख पाठविणे अयोग्य होईल. माझे मन निर्मळ आहे, मग कामदेवाची काय बिशाद आहे ? माझ्या पतीचे तपफळ मला तारील', असा विचार करून ती अतिथींना म्हणाली, ``मी तुम्हाला विवस्त्र होऊन वाढीन. तुम्ही आनंदाने भोजन करा.'' मग स्वयंपाकघरात जाऊन पतीचे चिंतन करून तिने विचार केला की, `अतिथी माझी मुले आहेत' व विवस्त्र होऊन वाढायला आली. पहाते तो अतिथींच्या जागी रडणारी तीन लहान बाळे ! त्यांना कडेवर घेऊन तिने स्तनपान करविले व बाळांचे रडणे थांबले.
इतक्यात अत्रीऋषी आले. तिने त्यांना सर्व वृत्तान्त सांगितला. ती म्हणाली, ``स्वामिन् देवेन दत्तं ।'' याचा अर्थ असा आहे - `हे स्वामी, देवाने दिलेली (मुले;)' यावरून अत्रींनी त्या मुलांचे नामकरण `दत्त' असे केले. त्यानंतर अत्रीऋषींनी अंतर्ज्ञानाने बाळांचे खरे रूप ओळखून त्यांना नमस्कार केला. बाळे पाळण्यात राहिली आणि ब्रह्मा, विष्णु व महेश त्यांच्यासमोर उभे राहिले व प्रसन्न होऊन `वर मागा', असे म्हणाले. अत्री व अनसूयेने `बालके आमच्या घरी रहावी', असा वर मागितला. तो वर देऊन देव आपापल्या लोकात गेले. पुढे ब्रह्मदेवापासून चंद्र, विष्णूपासून दत्त व शंकरापासून दुर्वास झाले. तिघांपैकी चंद्र व दुर्वास तप करण्यास जाण्यासाठी परवानगी घेऊन अनुक्रमे चंद्रलोकी व तीर्थक्षेत्री गेले. तिसरा दत्त विष्णुकार्यासाठी भूतलावर राहिला. हेच गुरूंचे मूळपीठ.