श्री
Marathi Culture and Festivals
Invitation to send entries for Diwali Digital Magazine - 2024
Namaskar,
We invite you to send articles, travel experiences, interviews, recipes, event news, stories, poems, charolya, or Diwali-related stories, and other related information to be published in the upcoming Diwali magazine. This is a good chance to showcase your talent to thousands of readers worldwide and a good platform for bloggers and writers.
The following are the guidelines:
1. You can write in Marathi or English; the article's word limit is 1500 words.
2. You are encouraged to send original and copyright-free pictures with your article.
3. If you have published the same article/ story in any media, send your original copy [word document] and not the newspaper or magazine clips. We prefer entries that have not been published before. We also prefer Google-type font.
4. You will be the sole proprietor of the material/articles you send and subject to copyright laws. Editors are not responsible for the content of the articles, and there is no payment for articles published in the e-Diwali ank/magazine.
5. Any article or poem sent to Marathi Culture and Festivals should not incite hatred for any religion or person, and jokes should not target any political leader or group.
6. Send your articles to ankdiwali@gmail.com - Please write “ Diwali edition 2024” in the subject line.
We have a limited space available for advertisements; if you want to advertise your business, please contact us via email: kokatayash@gmail.com. The advertisements in the edition will be subject to approval from the editors.
Kids Section:
Hello young friends and their parents!
We are accepting entries from Marathi background NRI kids and young adults.
This can be a wonderful summer vacation project.
This is a great opportunity for your children and young adults to share their talent on a global platform. Get ready to participate and have fun. You can express yourselves in many ways. You can send us an article, a short story, a poem, or a travel experience/s about your favorite Indian festival, such as Diwali. The entries could be in English or Marathi. You can write about your experience in current situations; you can also write a book review.
Age groups and suggested topics are as follows; please send relevant material in any format.
Suggested age groups and presentation guidelines:
Up to 6 years - Digital photo of a drawing or painting.
The picture should be of 300 dpi or better digital quality.
7-12 years- Short story, travel experience, or a poem
12-17 years - Your involvement in any or many Indian festivals and cultural events, short story or a poem
The article or story should not exceed 500 words.
Editors will select the best available creations, and their decision will be final.
Please send your digital pictures and /or articles to :
Mrs. Smita Dandekar 4sdandekar@gmail.com
Mrs. Sheetal Rangnekar sheetalwagle@gmail.com
The last date to submit your entries is July 31/2024
लेखकांसाठी काही महत्त्वाच्या गोष्टी :
आपण आपले लिखाण मराठी अथवा इंग्रजी यापैकी कोणत्याही भाषेमध्ये लिहू शकता. सदर लेख, कथा पाठवण्यासाठी शब्द मर्यादा अंदाजे १५०० शब्दांची आहे, कृपया 1500 शब्द मर्यादेवर लक्ष असू द्या. या मर्यादेपेक्षा खूप मोठे लेख वगळले जाऊ शकतात.
तुमच्या लिखाणासोबत त्या विषयाचे काही फोटोज पाठवलेत तर ते स्वागतार्ह आहे, मात्र ते फोटोज हे तुमचे स्वतःचे असावेत. त्यावर कुठलाही कॉपीराईट नसावा याची मात्र दक्षता घ्यावी.
आपल्या लेखनाचा विषय शक्यतो संस्कृती, उत्सव, दिवाळी या विषयाशी निगडीत असावा. अर्थात ही काही अट नाही. संपादकीय मंडळाच्या अनुमतीने इतर विषयांवरील लिखाण सुद्धा प्रसिद्ध केले जाईल. आपल्या साहित्यातून कोणत्याही विशिष्ट धर्मीयांची टिंगल, टीका अथवा कोणत्याही व्यक्तीवर टीका असू नये. आपण दिवाळीचा निखळ आनंद घेणार आहोत त्यामुळे व्यक्तिगत अथवा धार्मिक टीका-टिपण्णी करू नये. निखळ मनोरंजन हा आपला कायम हेतू असावा.
जर आपले लिखाण याआधी कुठे प्रकाशित झालेले असेल तर त्या लिखाणाची मूळप्रत ( वर्ड फाईल ) पाठवावी. आधीच्या वृत्तपत्र अथवा मासिकातील लेखाची Pdf फाईल पाठवू नये. गूगल टाईप असल्यास उत्तम.
या अंकात प्रसिद्ध झालेल्या सर्व साहित्याची तसेच त्यात व्यक्त केलेल्या मतांची संपूर्ण जबाबदारी ही त्या लेखकाची राहील. संपादक मंडळ कोणत्याही मतांची अथवा माहितीची जबाबदारी घेत नाही. आपण पाठवलेल्या साहित्याची मालकी ही सुद्धा त्या लेखकाचीच असेल.
या दिवाळी ई-विशेषांकात कोणते साहित्य प्रसिद्ध करायचे आणि कोणते साहित्य नाकारायचे याचा अंतिम निर्णय हा सर्वस्वी संपादकीय मंडळाचा असेल.
ही वेबसाईट आणि हा सर्व उपक्रम उत्स्फुर्तपणे सादर कलाविष्कार आहे. त्यामुळे आम्ही कोणत्याही लेख, कविता, विनोद अथवा कोणत्याही साहित्याचे पैसे अथवा मानधन देत नाही.
या वेबसाईटवर जाहिरातींची गर्दी अजिबात नसते. खूपच कमी जागा जाहिरातींसाठी आहे. ही वेबसाईट चालवण्यासाठी येणारा खर्च भागेल इतक्याच रकमेच्या जाहिराती आम्ही स्वीकारतो. त्यामुळे आपण कोणती जाहिरात करू इच्छित असाल तर संपादक मंडळाला तसे कळवावे म्हणजे आपल्या जाहिरातीसाठी जागा उपलब्ध करून दिली जाईल. जाहिराती संबंधित चौकशी ह्या ई-पत्या वर पाठवावी : kokatayash@gmail.com
वरील सर्व साहित्य अथवा आपण ankdiwali@gmail.com या मेल वरती पाठवाव्यात आणि विषय : दिवाळी-ई-एडिशन २०२४ असे लिहावे.
तर तमाम मराठी बंधु-भगिनींनो मोठ्या संख्येने आपले साहित्य आम्हाला पाठवा आणि जगभरातल्या आपल्या वाचक वर्गाला यंदाच्या दिवाळीला आपण हा अत्यंत चविष्ट आणि विविध रसांनी युक्त असा साहित्य फराळ भरभरून देऊयात
बालविभाग:
चिमुकल्यांनो आणि कुमारांनो मराठी कल्चर एंड फेस्टिवल्स च्या दिवाळी २०२४ अंकात तुम्ही पण सामील व्हावे. ह्या दिवाळी अंकात आपलं गुण दर्शन करूया! चला तर मग , आपल्या आई -बाबांची , आजी -आजोबांची मदत घ्या आणि आम्हाला तुमचे लिखाण , कलाकृती इत्यादी पाठवा. या वर्षी आम्ही भारताबाहेर वास्तव्य असणाऱ्या बालमंडळींकडून साहित्य व कलाकृती स्वीकारीत आहोत. वयो गट खालील प्रमाणे आहेत. सद्य परिस्थितीत तुम्हाला कसं वाटतंय? हे हि लिहून पाठवू शकता. ह्या परिस्थितीतून तुम्ही काय शिकलात? हे हि आम्हाला सांगा. एखादे नवीन पुस्तक वाचले असेल तर त्या पुस्तका बद्दल जरुर लिहा
वर्ष ६ पर्यन्त कलाकृती
वर्ष ७-१२ कविता , कहाणी , पर्यटनवर्ष
१२-१७ तुमचा आवडता सण, वृत्तांत , मनोगत वरील लिहिलेल्या विषयांव्यतिरिक्त पण काही वेगळाच विषय असेल तरी चालेल .
लिखाण - शब्द सीमा ५०० आहे.
चित्र - ३०० dpi अगर उच्च quality चे असावेतसंपादाकांचा निर्णय अंतिम असेल आणि त्या बाबत कुठलेही पत्र व्यवहार करू नयेत.खालील इमेल वर पाठवावेत , तुम्हाला काही प्रश्न असल्यास ह्यांना संपर्क करावा:
सौ. स्मिता दांडेकर 4sdandekar@gmail.com
सौ. शीतल वागळे sheetalwagle@gmail.com
साहित्य पाठविण्याची शेवटची तारीख जुलै ३१/२०२४
MCF Editorial Team,
Diwali digital magazine 2024
Past few years Diwali magazines for your Idea: