Kojagiri Pournima: The Sharad Purnima or Kojaagari Purnima or Kumar Purnima is a harvest festival celebrated on the full moon day of Ashvin (September–October). The rainy season is over, and the brightness of the full moon brings special joy. This is a traditional celebration of the moon and is also called the Kaumudi celebration, Kaumudi meaning moonlight.
At night, goddess Lakshmi is worshiped, and night vigil is observed. According to a folk-tale, once a king fell on evil days, and was in great financial straits, but then his queen observed this fast and night vigil, and worshiped the goddess of wealth, Laxmi. Consequently, they were blessed by the goddess and they regained their prosperity.
It is also believed that on this day as moon and the earth are very close to each other, the moon rays have certain healing properties of nourishing the body and the soul.
Some people believe that on this night Laxmi goes around from place to place asking, "Who is awake?" ("Kojagarti?") and showers her blessings on those she finds awake. Hence, the night is spent in festivity and various games of amusement, in honor of the goddess.
The eldest child of the family is also honored on this day.There is a tradition in many households to offer an Arti [ Aukshan औक्षण ] to the eldest child and offer them any gift , Preferably a white garment with silver embroidery .
How to celebrate?
1. Make masala milk in the day time
2. Gather with family and friends in the night outside in the yard or the terrace / deck from where you can see the Moon.
3. Offer arti to Moon and offer nivedya of this masala milk to the Moon. And keep the milk pot open for few minutes so the milk can absorb moonrays.
4. Sing and dance the night away! And enjoy the masala milk.
The relevance of this
Relevance of Drinking milk: There is an Ayurvedic reason behind consuming rice flakes with cool milk on this night. Sharad ritu (season) consists of two months of overlapping seasons when the summer is about to end, and the winter slowly starts. During Sharad the days are warm, and nights start to become cooler. This is perfect season fo pitta prakop [ acidity] when pitta vitiates along with other two doshas. Consuming rice flakes with milk during night time is good remedy to pacify pitta
Legend behind Sharad Purnima
There was a king who was going through a bad time and financial strains. His wife kept on praying Goddess Lakshmi who is known as the Goddess of wealth. Also, she stayed awake for nights. Seeing her devotion, Goddess Lakshmi blessed them, and they regained prosperity.
Apart from the tale, there is a belief behind the logic of waking up throughout the night. The belief is such that the Moon comes close to Earth on this day and has some healing powers that are good for the nourishment of body as well as soul.
Another legend is from Sanatkumar Samhita. The tale is about a poor Brahmin named Valit who used to live in Magadhdesh, Bengal. He was quite a virtuous and learned man, but his wife was totally opposite and quarreling in nature. Once the Valit was performing Shraddha of his father, his wife flung” pind”[ ball] of wheat-flour dough in sewage pit. As per custom, it was meant to be flown in holy river Ganga. She did that in anger as they hardly had food to eat. Valit got infuriated of this act. He left home in search of wealth. On the way in the jungle, he met Naagkanyas, the girls of Kaliya Naag ancestry. These Naag-kanyas had observed Sharad Purnima Vrat and were awake, Valit was also observing fast on that day. As they all had to stay up, they sat on gambling. Valit lost everything he had at that time. Suddenly, Lord Vishnu as well as Goddess Lakshmi passed by their way. Due to Valit's fast, Goddess Laxmi blessed him with handsomeness similar to Kaamdeva, the deity of love. Seeing him so handsome, all Naagkanyas got attracted toward him and married him. With this, Valit also received all their riches. After that, Valit returned home and his wife welcomed him warmly. Since this episode, Samhita declared those who remain awake on the night of Sharad Poornima get graced with wealth.
कोजागरी पौर्णिमा (शरद पौर्णिमा
कोजागरी पौर्णिमेच्या दिवशी चंद्र पृथ्वीच्या सर्वाधिक जवळ असतो. या दिवशी रात्री लक्ष्मी आणि इंद्र यांची पूजा केली जाते. मध्यरात्री लक्ष्मी पृथ्वीतलावर येऊन जो जागा आहे, त्याला धनधान्य आणि समृद्धी प्रदान करते, अशी कथा आहे. या दिवसाचे महत्त्व आणि पूजाविधी या लेखातून समजून घेऊया.
तिथी: कोजागरी पौर्णिमा हा उत्सव आश्विन पौर्णिमा या तिथीला साजरा करतात.
इतिहास: या दिवशी भगवान श्रीकृष्णाने व्रजमंडळात रासोत्सव साजरा केला, असे श्रीमद्भागवतात म्हटले आहे.
महत्त्व:
1. वर्षातील या दिवशी चंद्र पृथ्वीच्या सर्वांत जवळ असतो आणि त्यामुळे तो मोठा दिसतो. मूळ चंद्रतत्त्वाचे म्हणजे ‘चंद्रमा’चे प्रतिनिधित्व करणारा आणि आपल्याला दिसणारा चंद्र ‘चंद्रमा’प्रमाणेच शीतल आणि आल्हाददायक आहे. साधकांना चंद्रासारखी शीतलता ईश्वराच्या अवतारांपासून अनुभवता येते, म्हणूनच रामचंद्र, कृष्णचंद्र अशीही नावे राम-कृष्णांना दिली गेली. चंद्राच्या या गुणांमुळेच ‘नक्षत्राणामहं शशी’ म्हणजे ‘नक्षत्रांमध्ये मी चंद्र आहे’, असे भगवान श्रीकृष्णाने श्रीमद्भगवद्गीतेत (१०:२१ सांगितले आहे.
2. मध्यरात्री श्री लक्ष्मी चंद्रमंडलातून भूतलावर येऊन ‘को जागर्ति’ म्हणजे ‘कोण जागे आहे ?’, असे विचारून जो जागा असेल, त्याला धनधान्याने संतुष्ट करते.
३. या दिवशी ब्रह्मांडात आदिशक्तीरूपी धारणेतील श्री लक्ष्मीरूपी इच्छाशक्तीची स्पंदने कार्यरत असतात. या दिवशी धनसंचयाविषयी असलेल्या सकाम विचारधारणा पूर्णत्वाला जातात. या धारणेच्या स्पर्शाने स्थूलदेह, तसेच मनोदेह यांची शुद्धी होण्यास साहाय्य होऊन मनाला प्रसन्नधारणा प्राप्त होते. या दिवशी कार्याला विशेष असे धनसंचयात्मक कार्यकारी बल प्राप्त होते.
४. या दिवशी चंद्र पृथ्वीच्या सर्वांत जवळ, म्हणजे कोजागरी पर्वतालगत आलेला असतो. त्यामुळे या पौर्णिमेला ‘कोजागरी पौर्णिमा’ म्हटले जाते.
कोजागिरी च्या रात्री जो जागृत आणि सावध असतो, त्यालाच अमृतप्राशनाचा लाभ मिळतो ! कोजागर · को ± ओज ± आगर. या दिवशी चंद्राच्या किरणांद्वारे सर्वांना आत्मशक्तीरूपी (ओज आनंद, आत्मानंद, ब्रह्मानंद भरभरून मिळतो; परंतु हे अमृत प्राशन करण्यासाठी ऋषी म्हणतात, ‘को जागर्ति ?, म्हणजे कोण जागृत आहे ? कोण सावध आहे ? कोण याचे माहात्म्य जाणतो ? जो जागृत आणि सावध आहे आणि ज्याला याचे माहात्म्य ठाऊक आहे, त्यालाच या अमृतप्राशनाचा लाभ मिळेल !’ – प.पू. परशराम पांडे महाराज, सनातन आश्रम, देवद, पनवेल.
उत्सव साजरा करण्याची पद्धत
‘या दिवशी नवान्न (नवीन पिकवलेल्या धान्याने जेवण करतात. श्री लक्ष्मी आणि ऐरावतावर बसलेला इंद्र यांची रात्री पूजा करतात. पूजा झाल्यावर पोहे आणि नारळाचे पाणी देव आणि पितर यांना समर्पून नंतर नैवेद्य म्हणून ग्रहण करतात आणि मग आपल्याकडे आलेल्या सर्वांना देतात. शरद ऋतूतल्या पौर्णिमेच्या स्वच्छ चांदण्यात दूध आटवून चंद्राला आटीव दुधाचा नैवेद्य दाखवतात आणि नंतर नैवेद्य म्हणून ते दूध ग्रहण करतात. चंद्राच्या प्रकाशात एकप्रकारची आयुर्वेदिक शक्ती आहे. त्यामुळे हे दूध आरोग्यदायी आहे. या रात्री जागरण करतात. करमणुकीसाठी निरनिराळे बैठे खेळ खेळतात. दुसर्या दिवशी सकाळी पूजेचे पारणे करतात. ह्या दिवशी घरातल्या सगळ्यात मोठ्या अपत्याचे औक्षण करायची पण पद्धत आहे .
कोजागरी पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मी आणि इंद्र यांचे पूजन करण्याची कारणे
१. या दोन देवतांना पृथ्वीवर तत्त्वरूपाने अवतरण्यासाठी चंद्र आग्रहात्मक आवाहन करतो.
२. लक्ष्मी ही आल्हाददायक आणि इंद्र ही शीतलतादायक देवता आहे. यादिवशी वातावरणात या दोन देवता तत्त्वरूपाने येत असल्याने आणि त्यांचे तत्त्व अधिक प्रमाणात कार्यरत असल्याने त्यांची पूजा केली जाते.
३. लक्ष्मी आणि इंद्र यांच्या पूजेत पोहे आणि नारळाचे पाणी वापरतात. पोहे हे आनंद देणारे, तर नारळाचे पाणी हे शीतलता प्रदान करणारे आहे. त्यामुळे हे दोन घटक वापरून जीव स्वतःकडे आनंद आणि शीतलता यांच्या लहरी आकर्षित करत असतो.
४. चंद्राला आटीव दुधाचा नैवेद्य दाखवतात; कारण या दिवशी दुधात चंद्राचे प्रतिबिंब पाहिल्याने त्यातून प्रक्षेपित होणारे चंद्रतत्त्व आपल्याला मिळते. या दुधात स्थूल आणि सूक्ष्म रूपांतून चंद्राचे रूप अन् तत्त्व आकर्षित झालेले असते.
५. जागरण : मध्यरात्री लक्ष्मी चंद्रमंडलातून भूतलावर येते आणि जो जागा असेल, त्याच्यावर संतुष्ट होऊन त्याला कृपाशीर्वाद देऊन जाते. त्यामुळे कोजागरीच्या रात्री जागरण केले जाते.
वरील कोजागिरीची माहिती मराठीत श्री प्रशांत वोर्लीकार मुंबई ह्यांनी संकलित केली आहे .